निबंध : शाळा बंद पडल्या तर
प्रस्तावना
शाळा म्हणजे ज्ञानाचे आणि संस्कारांचे मंदिर. शाळेमुळे विद्यार्थ्यांचे जीवन घडते. शाळेमध्ये आपल्याला शिक्षण, शिस्त, मैत्री, संस्कार आणि खेळ हे सर्व एकत्र मिळतात त्यामुळेच आपल्या जीवनात शाळेचे अनन्यसाधारण महत्व आहे . पण कधी काही कारणांनी शाळा बंद पडल्या, तर त्याचे परिणाम खूप गंभीर असतात.
शाळा बंद पडल्याचे कारण
कोरोनाच्या आजारपणाची साथ आली त्यावेळी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या , कधी पूर, वादळयांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे तर , कधी सरकारी कारणांमुळे शाळा बंद ठेवल्या जातात. सुरक्षेच्या दृष्टीने हे काही वेळेस आवश्यक देखील असते, पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे फार काळजीचे असते.
शाळा बंद असल्याचे परिणाम
शाळा बंद असल्या की विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबते व पुढील शिक्षणात अडचणी येतात . रोज शिकणं, वर्गातील चर्चा, शिक्षकांचे मार्गदर्शन यापासून विद्यार्थी दूर राहतात.तसेच शाळेतील मैदानावर होणारा शारीरिक व्यायाम थांबतो आणि मोबाईल आणि टीव्हीकडे मुलांचा ओढा वाढतो. ऑनलाईन शिक्षण जरी उपलब्ध असले, तरी ते प्रत्यक्ष शाळेएवढे प्रभावी नसते. प्रत्यक्ष शाळेत शिक्षकांच्या सहवासात झालेले शिक्षण अधिक प्रभावी असते .
शाळा बंद पडल्या तर सामाजिक आणि मानसिक परिणाम
शाळेमुळे मुलांमध्ये शिस्त, मैत्री, एकमेकांशी सहकार्य आणि स्पर्धा यांचा विकास होतो. शाळा बंद असल्यामुळे हे गुण रुजत नाहीत. शाळा बंद पडल्या तर अनेक मुले एकटे पडतात, निराश होतात. खेळ, चित्रकला, सांस्कृतिक कार्यक्रम सगळे थांबतात. असे सामाजिक आणि मानसिक दुष्परिणाम घडतात .
शाळा बंद पडू नये यासाठी उपाय आणि भूमिका
शाळा बंद पडू नयेत यासाठी सरकारने आणि पालकांनी योग्य काळजी घ्यायला हवी. शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण अधिक प्रभावी बनवावे.विद्यार्थ्यांना सहज आणि पुरेसे मार्गदर्शन सहज उपलब्ध होईल याकडे लक्ष द्यावे . पालकांनी आपल्या मुलांना घरी अभ्यासाची सवय लावावी. विद्यार्थ्यांनी वेळेचा उपयोग करून स्वयंअभ्यास करावा आणि त्यातून विकास साधण्याचा प्रयत्न करावा .
निष्कर्ष
शाळा बंद पडल्या तर विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाते. शाळा म्हणजे शिक्षण, संस्कार आणि आनंद यांचा संगम आहे. म्हणून शाळा सतत सुरू राहाव्यात यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. कारण शाळा म्हणजे उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी आहे.
तुम्हाला हा निबंध नक्की आवडेल अशी मला खात्री आहे . हा निबंध तुम्ही परीक्षेत तसेच विविध स्पर्धांमधेही वापरू शकतात . निबंधाविषयी तुमचे मत आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका .
हा निबंध लोक खालील नावानेही शोधतात
- |shala band padlya tar marathi nibandh
- |शाळा बंद पडली तर मराठी निबंध
- |शाळा बंद पडली तर मराठी निबंध pdf
- |शाळा बंद पडली तर निबंध
शाळा बंद पडल्या तर काय होईल निबंध (What will happen if schools close essay)
शाळा नसत्या तर निबंध मराठी (If there were no schools essay in Marathi)
शाळा बंद पडल्या तर काय होईल कल्पना विस्तार (Expansion of idea: If schools were to close)
माझी शाळा निबंध मराठी (My school essay Marathi)
शाळेचे महत्व निबंध (Importance of school essay)
शाळा बंद पडल्या तर मुलांवर होणारे परिणाम (Impact on children if schools close)
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.